महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ममतादीदींसाठी जुन्या सहकाऱ्याचा ‘हात’ सोडणार काँग्रेस

06:49 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बंगालमध्ये नव्या राजकीय समीकरणाचे संकेत : डाव्या पक्षांना बाजूला सारणार

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

तामिळनाडू, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशानंतर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसला एका मजबूत सहकाऱ्याचा शोध आहे. पक्ष पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबतची आघाडी संपुष्टात आणत तृणमूल काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमूल आणि काँग्रेसने आघाडी करत सामोरे जावे असा प्रयत्न सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने राज्यात चांगली कामगिरी केली आहे, तृणमूल एकीकडे 29 जागा जिंकण्यास यशस्वी ठरला, तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी करत निवडणूक लढविली होती, परंतु डाव्यांना खातेही उघडता आले नाही. याचबरोबर दोन्ही पक्षांच्या मतांच्या हिस्सेदारीत 2 टक्क्यांची घसरण झाली. अशास्थितीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्ये आघाडीवरून पुनर्विचाराची मागणी होऊ लागली आहे.

डाव्यांच्या साथीने आम्ही विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक लढलो आहोत आणि याचे परिणाम देखील आमच्यासमोर आाहेत. अशा स्थितीत नव्याने स्वत:च्या रणनीतीवर विचार करण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमध्sय काँग्रेसचे अस्तित्व कायम राखायचे असेल तर तृणमूल काँग्रेससारख्या मजबूत पक्षासोबत आघाडी करावी लागणार आहे. डाव्या पक्षांसोबतची आघाडी सपशेल अपयशी ठरल्याचे उद्गार काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने काढले आहेत.

तृणमूलसमोरही आव्हान

लोकसभा निवडणुकीत तृणमूलने चांगली कामगिरी केली असली तरीही निकालातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी पुढील मार्ग सोपा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बंगालच्या अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली आहेत. निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला केवळ काँग्रेस उमेदवारांमुळे चार मतदारसंघांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. याचबरोबर राज्यातील शहरी भागांमध्ये तृणमूलला भाजपपेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर भवानीपूर मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी झाले आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच आमदार आहेत. अशा स्थितीत तृणमूलसाठी देखील आगामी वाटचाल सोपी नसेल.

तृणमूलबाबत मवाळ धोरण

पश्चिम बंगालमध्ये अधीर रंजन चौधरी यांच्यामुळे काँग्रेससोबत आघाडी होऊ शकली नाही असे तृणमूल काँग्रेसने वारंवार म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी अधीर रंजन चौधरी यांनी दर्शविली आहे. अशास्थितीत त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास काँग्रेस नेतृत्वाकडून तृणमूलबाबत मवाळ भूमिका बाळगणाऱ्या नेत्याला ही जबाबदारी सोपविली जाऊ शकते. यामुळे भविष्यात तृणमूलसोबत आघाडी स्थापन करण्याची शक्यता कायम राहिल असे काँग्रेस नेतृत्वाचे मानणे आहे. अधीर रंजन चौधरी यांचा बेहरामपूर लोकसभा मतदारसंघात तृणमूलचे उमेदवार युसूफ पठाण यांनी पराभव केला आहे. युसूफ पठाण हे राज्याबाहेरील असूनही त्यांचा विजय झाल्याने तो चौधरी यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article