Kolhapur News : जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसकडून कोल्हापुरात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत काँग्रेसचे उमेदवारी अर्ज दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून, अर्ज भरण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जोमाने मैदानात उतरले असून, कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले जात आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सात ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज कसबा बावडा येथील महासैनिक प्रशिक्षण केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी एकत्रित येत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी आणि उत्साहात काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अर्ज दाखल करण्यासाठी उरलेल्या मोजक्या दिवसांमुळे पुढील दोन दिवसांत शहरात आणखी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.