For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस–आरजीपीच्या बैठकीत समान जाहीरनाम्यावर चर्चा; जागावाटपाचा निर्णय अद्याप बाकी

04:36 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस–आरजीपीच्या बैठकीत समान जाहीरनाम्यावर चर्चा  जागावाटपाचा निर्णय अद्याप बाकी
Advertisement

पणजी : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) यांच्यातील चर्चांना वेग आला आहे. दोन्ही पक्षांच्या बैठकीत समान जाहीरनामा तसेच विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

बैठकीत कलम 39 ‘अ’ रद्द करण्यासह गोव्याशी संबंधित विविध प्रश्नांचा समान जाहीरनाम्यात समावेश करण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी आपापले प्रमुख मुद्दे मांडले असून, त्यावर पुढील चर्चेनंतर समान कार्यक्रम निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली, मात्र त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे काँग्रेसच्या सहप्रभारी अंजली निंबाळकर यांनी सांगितले. जागावाटप आणि संघटनात्मक बाबींवर पुढील बैठकींमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

काँग्रेस आणि आरजीपीने यापूर्वी 2027 च्या विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. मात्र, प्रत्यक्ष जागावाटप, समान जाहीरनामा आणि अन्य निवडणूकविषयक बाबींवर अंतिम स्वरूप देण्याचे काम अद्याप सुरू आहे.

Advertisement
Tags :

.