काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर जोरदार हल्ला करताना काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात केला असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेत आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला देत काँग्रेसवर आरोप केला.
लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्राचा दाखला दिला. ते पत्र सोकसभेत वाचून दाखवताना त्यांनी पंतप्रधानांचा आरक्षणाला कसा विरोध होता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पत्राच्या वाचनानंतर ते म्हणाले, "काँग्रेसने सत्तेसाठी लोकशाहीचा गळा घोटला. तसेच लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकारे बरखास्त केली. काँग्रेस दलित, मागास, आदिवासींच्या विरोधात आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर या लोकांना कधीच आरक्षण मिळाले नसते." असे ते म्हणाले.
माजी केंद्रीय कायदा मंत्री एचआर भारद्वाज भारद्वाज यांनी त्यांच्या 'नेहरू : गेझिंग ॲट टुमारो' या पुस्तकात नेहरूंनी 27 जून 1961 रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा विस्तृत उल्लेख केला आहे. या पुस्तकामध्ये नेहरूंनी जाती आणि जातीय आधारावर कोट्याला विरोध केला असल्याचा दावा केला आहे. यापुस्तकातील काही भाग पंतप्रधानांनी वाचून दाखवताना “मी हे जाणून आश्चर्यचकित झालं आहे की नोकरमधील पदोन्नती देखील जातीय आणि जातीय विचारांवर आधारित असतात. हा मार्ग केवळ मूर्खपणाच नाही तर आपत्तीजनकही आहे. मागासलेल्या गटांना सर्व प्रकारे मदत करूया, परंतु कार्यक्षमतेच्या किंमतीवर नाही."