महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप विरोधात काँग्रेसची निदर्शने! अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

10:51 AM Sep 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
Congress protests against BJP
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देवून अक्षेपार्ह वक्तव्य करण्याऱ्या भाजप व शिवसेना शिंदे गटाचा कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. शुक्रवारी काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देत, अक्षेपार्ह वक्तव्य करणऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

भाजप नेता तरविंदरसिंह मारवा, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांचा निषेध करण्यात आला. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे देश विघातक वृत्तीने महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. भाजपचे सरकार मात्र त्यावर काही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व अक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला. अशा विकृती विरोधात गुन्हा नोंदवून अटक करावी अशी मागणी, काँग्रेस तर्फे करण्यात आली.

Advertisement

यावेळी सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, भारती पवार, संध्या घोटणे, वैशाली महाडिक रंगराव देवणे, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, अरुण कदम, हेमलता माने, विद्या घोरपडे, मंगल खुडे, उज्वला चौगुले, चंदा बेलेकर, अलका सलगर, जया पवार, सिंधू शिरोळे सुमन ढेरे, निर्मला सालढाणा, शालिनी खंदारे, वैशाली कवाळे चंद्रकला कांबळे, वैशाली जाधव, संगीता कवाळे, संग्रामसिंह गायकवाड, उदय पवार, अक्षय शेळके, डॉ. प्रमोद बुलबुले, प्रवीण पुजारी, कौसर पटेकर, यशवंत थोरवत, सम्राट बराले, अमर जरग, सुजितसिंह देसाई, प्रवीण पाटील, दीपक थोरात, रमेश कांबळे, अन्वर शेख आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
anti-Axis statementsCongress protestsmaking anti-Axis statements
Next Article