Satara News : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पाटण येथे काँग्रेसतर्फे निदर्शने
01:48 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
पाटणः देशात सुरु असलेल्या पेट्रोल, डिझेल व महागाईच्या प्रचंड दरवाढीचा तीव्र निषेध करण्यासाठी पाटण विधानसभा राष्ट्रीय व युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आली. लवकरात लवकर इंधनाचे दर कमी करण्यात आले नाहीत तर तीव्र जनआंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कारण पुढे करून इंधनाचे माव सातत्याने वाढवले जात आहेत. तसेच महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र कंबरडे मोडले आहे.
इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत, ज्यामुळे गोरगरीब जनतेला जगणे कठीण झाले आहे. याप्रसंगी नरेंद्र पाटणकर, संतोष कदम, किरण हादवे, राहुलराज पवार यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, युवक जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, कराड युवक तालुकाध्यक्ष देवदास माने, चैतन्य पाटील, दिग्विजय जमाले, अक्षय सुर्वे, मुकुंद पाटील, तेजस कांबळे, रविराज पाटील, तौफिक पटेल्ल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष कदम, सेवादल अध्यक्ष आनंदराव नांगरे, पांडुरंग यादव, किरण हादवे, रवींद्र कांबळे, सुनील गायकवाड, मृणाल यादव, दीपक तांदळे, शुभम पाटील कार्यकर्ते सहभागी झाले.
Advertisement
Advertisement