For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mallikarjun Kharge take Oath काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

08:36 PM Jun 29, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
mallikarjun kharge take oath काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
Advertisement

► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. कर्नाटकातून संसदेच्या वरिष्ठ सभागृहावर त्यांची पुनर्निवड झाली आहे. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Advertisement

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी-वधेरा आणि अनेक ज्येष्ठ नेते व मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.