For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज गोवा भेटीवर

06:50 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज गोवा भेटीवर
Advertisement

पक्षनेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

Advertisement

पणजी (प्रतिनिधी) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज दि. 17 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. अध्यक्ष बनल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट आहे. दोन दिवस त्यांचे वास्तव्य गोव्यात राहणार आहे. रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी ही माहिती दिली. त्यावेळी तुलियो यांचीही उपस्थिती होती. खर्गे यांचे आज दुपारी 3.30 वाजता दाबोळी विमानतळावर आगमन होणार असून तेथून ते थेट दक्षिण गोव्यात वेर्णा येथे प्रयाण करणार आहे. तेथील क्विंटा दे वालादारीस सभागृहात सायंकाळी ते पक्षाचे तमाम वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संघनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रामुख्याने बूथ स्तरीय कार्यकर्त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश असेल.

लवकरच म्हणजे शक्यतो येत्या फेब्रुवारी महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार असून त्या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर दि. 18 रोजी पक्षाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक होणार असून  त्यावेळी खर्गे मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय राज्यातील विविध बिगर सरकारी संघटनांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशीही खर्गे संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ते दिल्लीकडे परतणार आहेत, असे कवठणकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.