For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना गोवा राज्य स्थापना दिनाचे निमंत्रण

03:03 PM May 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना गोवा राज्य स्थापना दिनाचे निमंत्रण
Advertisement

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल गुरुवारी माहिती दिली की त्यांनी व विधानमंडळ काँग्रेस पक्षनेते युरी आलेमाव यांनी बेंगळुरूमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी त्यांना 30 मे 2025 रोजी होणाऱ्या गोवा राज्य स्थापना दिन समारंभासाठी आमंत्रण दिले. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. ही गोव्यातील जनतेसाठी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी घटना ठरेल. या बैठकीत गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली. भाजपप्रणीत सरकारचे अपयशी व जनविरोधी धोरण, तसेच राज्यभरातील वाढती जनतेची नाराजी यावरही चर्चा करण्यात आली.

Advertisement

पाटकर यांनी सांगितले की 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकांसाठीचा कार्ययोजना (रोडमॅप) विस्तृतपणे मांडण्यात आला. काँग्रेसचे संघटन स्थानिक स्तरावर बळकट करण्यावर भर देत, भाजपला पर्याय ठरेल, असा विश्वासार्ह व जनतेकेंद्रीय पर्याय सादर करण्यावर भर देण्यात आला. खर्गेना गोवा काँग्रेस नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे आमच्यासाठी एक मोठे बळ आहे. त्यांचा हा दौरा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम निर्माण करेल व संपूर्ण काँग्रेस संघटनेत आत्मविश्वास वाढवेल. गोव्याचे भविष्य पुन्हा मिळवण्याची चळवळ आता सुरू झाली आहे. आम्ही एकसंघ आहोत, ठाम आहोत आणि भाजपला थेट सामोरे जाण्यास पूर्णत: सज्ज आहोत, जेणेकरून गोव्यात चांगले शासन पुन्हा प्रस्थापित करता येईल, असेही पाटकर म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.