महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या रडारवर आता काँग्रेस

06:06 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. कधी काळी मुंबई काँग्रेस म्हणजे देवरा आणि देवरा म्हणजेच काँग्रेस असे राजकारणात वेगळेच समीकरण मानले जात होते. त्याप्रकारची मुंबई काँग्रेसची बांधणीदेखील मुरली देवरा यांनी केली होती. नंतरच्या काळात बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेचा मुंबईत जोर वाढलेला असताना देखील मुरली देवरानी काँग्रेसचे महत्त्व कमी होऊ दिले नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचे करिअर घडविले, मात्र कधी ना कधी तुमच्या अस्तित्वात अथवा तुमच्यानंतर मोठ्मोठ्या साम्राज्याला उतरती कळा ही लागतेच. गेल्या 10 वर्षात देशांत कॉंग्रेसला उतरती कळा लागली. अखेर 55 वर्षांचा काँग्रेसचा घरोबा मिलिंद देवरा यांनी संपुष्टात आणत भाजपप्रणीत शिंदे गटाच्या शिवसेनेची वाट धरली.

Advertisement

लोकसभा निवडणूका जस जशी जवळ येत आहे, तस तशी नवीन राजकीय समीकरणे वेग घेत असून आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने प्रत्येक नेता हा आपली राजकीय स्पेस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ती शोधत असताना पक्षनिष्ठा, त्याग वगैरे साधनशुचितेला तिलांजली देत पक्षांतर करताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात झालेला राजकीय गोंधळ बघता नेत्यांना अनेक पर्याय उपलब्ध झाले असले तरी त्यात राजकीय पुनर्वसन होईलच का? हा मोठा प्रश्न आहे. राज्यातील प्रमुख दोन प्रादेशिक पक्षांची झालेली शकले बघता 2024 ची लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचा विचार करता 45 प्लस अशी घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील समन्वय कसा साधला जाणार हा भाजपच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय नाही, कारण भविष्यात भाजपच शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागा ठरवतील यात शंका नाही. पाव्हण्याच्या जोड्याने विंचु मारायचा ही भाजपची पध्दत असून त्याचाच एक भाग की काय मिलिंद देवरा यांचा शिंदे गटातील प्रवेश असल्याचे मानले जात आहे. कारण मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून खासदार, केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहीले आहेत. कधी काळी मुंबई काँग्रेसमध्ये मुरली देवरा आणि गुरूदास कामत हेच दोन गट होते. मात्र गुरूदास कामत यांच्या निधनानंतर कामत गट संपला मात्र मुरली देवरा यांच्या निधनानंतरही त्यांचे चिरंजीव असलेल्या मिलिंद देवरा यांनी देवरा गटाचे अस्तित्व कायम ठेवले. मात्र मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर देवरा यांनी काँगेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचे मुंबईचे अध्यक्षपद केंद्रात मंत्री राहिल्यानंतरही भाजपात जाण्याऐवजी शिंदे गटात जाणेच का पसंत केले? तर त्यामागचा राजकीय अर्थ काढला तर, भाजपला शिवसेनेकडे असलेल्या जागांवरही आपला उमेदवार जो सर्वच बाबतीत प्रबळ आणि इलेक्टीव मेरीट हाच फॉर्म्युला राहणार आहे. मिलिंद देवरा यांचा शिवसेनेतील प्रवेश बघता तो व्हाया भाजपच झाला असेल यात शंका नाही. भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना जागावाटपात मानाचे पान दिल्याचे पण दाखवायचे आणि उमेदवार आपले लादायचे असे भाजपने यापूर्वी देखील केले आहे. 2019 ला सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपचेच उमेदवार असलेले नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर तर पालघर लोकसभा मतदार संघातून 2024 ची निवडणूक लढवत जिंकली. त्यामुळे देवरा यांचा शिवसेना प्रवेश जरी वाटत असला तरी देवरांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघाचा विचार करता भाजपने मायक्रो प्लॅनिंगवर काम सुरू केले आहे. सोबत असलेल्या मित्रपक्षांना नाराज न करता त्यांना खूप काही दिल्यासारखे दाखवायचे मात्र आपला सुप्त हेतु साध्य करायचा हे 2019 नंतर भाजपचे राजकीय गणित राहीले आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता भाजप हे आपल्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांचेही उमेदवार ठरवणार आणि त्यांच्या सोयीच्या उमेदवारांचे पक्षांतर घडवून आणणार यात शंका नाही. भाजपने सध्या शिवसेना शिंदे गटाला सुटणाऱ्या जागांवर लक्ष केंद्रीत केले असून शिंदेंच्या शिवसेनेला सुटणाऱ्या जागा आणि तेथील विद्यमान खासदारांचा विचार करता आगामी काळात शिंदे गटाला सुटणाऱ्या ठिकाणी धक्कादायक पक्षप्रवेश होतील. मुंबईत 6 जागांपैकी 4 जागा भाजप लढविणार असून, उध्दव ठाकरे आणि भाजपच्या 2019 च्या फॉर्म्युल्यानुसारच शिंदे गटाला जागा सोडण्यात येतील असे वाटते. दक्षिण मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार असून भाजपने यापूर्वी या जागेवर दावा केला होता. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उमेदवार असल्याच्या चर्चा आल्यानंतर, शिंदे गटाच्या जागांवरही भाजपच लढणार अशा बातम्या माध्यमातून आल्या. मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेसला भाजपने धक्का दिला. खासदार गजानन किर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मतदार संघातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरे गटाकडून गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जवळपास नक्की झाली असून त्यांच्या विरोधात जर शिंदे गटातील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना उमेदवारी दिल्यास बाप-बेटे समोरासमोर लढणार का? की येत्या काळात उत्तर मुंबईतून खासदार राहिलेले आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले संजय निरूपम हे पण शिंदे गटात प्रवेश करणार का? हे बघावे लागेल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फोडाफोडीच्या अध्यायानंतर आता काँग्रेस भाजपच्या रडारवर असणार यात शंका नाही.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article