महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसचे पाच खासदार निलंबित ! घोषणाबाजी करून गैरवर्तन केल्याचा आरोप

03:22 PM Dec 14, 2023 IST | Abhijeet Khandekar
Congress MP suspended
Advertisement

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी काँग्रेसच्या पाच सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेदरम्यान या पाच खासदारांनी सभापतींच्या आसनाचा मान राखला नसल्याचे कारण दिले आहे. या निलंबित खासदारांमध्ये प्रथापन, हिबी एडन, कुरियाकोसे, जोठी मणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे.

Advertisement

संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असून काल दहाव्या दिवशी दोन तरूणांनी लोकसभेत घुसखोरी केली. आणि पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे काल संसदेचं कामकाज काही काळ तहकुब करण्यात आले आहे. तरुणांच्या या कृत्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐऱणीवर आला आहे. त्यावरून आज क़ॉग्रेसच्या खासदारांनी अधिवेशनाच्या 10 व्या दिवशी सुरक्षेच्या कारणावरून लोकसभेत घोषणा दिल्या.

Advertisement

दरम्यान, कॉग्रेसच्या खासदारांनी ‘पीएम सदन मे आओ....अमित शाह शरम करो’ अशा प्रकारच्या घोषणा दोन्ही सभागृहात दिल्या गेल्या. तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या गदारोळादरम्यान घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांचे तात्काळ प्रभावाने निलंबन करण्यात आले. कर काँग्रेसच्या . टी एन प्रथापन, हिबी इडन, डीन कुरियाकोसे, जोथी मणी आणि रम्या हरिदास या पाच आमदारांचेही निलंबन करण्यात आले.

 

Advertisement
Tags :
# Congress MPSuspended
Next Article