For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचे विकासाचे मॉडेल केव्हाच भंगारमध्ये : नितीन गडकरी

01:46 PM May 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
काँग्रेसचे विकासाचे मॉडेल केव्हाच भंगारमध्ये   नितीन गडकरी
MP Nitin Gadkari
Advertisement

मिरज प्रतिनिधी

आर्थिक महासत्तेकडे झेपावणारा भारत देश भविष्यात सक्षम, खंबीर नेतृत्वाकडे द्यायचा की गेली 70 वर्षे गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे शोषण करणाऱ्या काँग्रेसकडे द्यायचा? हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. आत्तापर्यंतचे काँग्रेसचे विकासाचे मॉडेल भंगारमध्ये गेले आहे. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरविणाऱ्या नरेंद्र मोदींसारख्या योग्य आणि सक्षम नेतृत्वाकडे पुन्हा देशाची सत्ता द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Advertisement

सांगली लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील बालगंधर्व नाट्यागृहात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भविष्यातील भारत आणि काँग्रेसची राजकीय निती यावर आपले प्रखर विचार मांडले. अध्यक्षस्थानी राज्याचे कामगार तथा पालकमंत्री सुरेश खाडे उपस्थित होते. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, शहर जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भगवान साळुंखे, रमेश शेंडगे, मकरंद देशपांडे, नीताताई केळकर, दिपक शिंदे, सुशांत खाडे, पांडूरंग कोरे, माजी महापौर सुरेश पाटील, पद्माकर जगदाळे, पोपटराव कांबळे, गणेश माळी, सौ. सुमन खाडे, सौ. स्वाती शिंदेंसह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.