महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ताई, जय श्रीराम...! प्रणिती शिंदेंच्या ट्विटला आ. राम सातपुतेंचे उत्तर

05:06 PM Mar 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

पाटकुल प्रतिनिधी

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे. याला आ. राम सातपुते यांनी ट्वीटर वरून उत्तर दिले आहे.

Advertisement

राम सातपुते यांनी ट्विट केले की, ताई, जय श्रीराम! आपण केलेल्या स्वागताबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..! गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलेच तापू लागले आहे. काँग्रेसकडून यंदा या मतदारसंघासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती यांनी पत्र लिहित उमेदवार इथला असो किंवा बाहेरचा, असा टोला लगावत सातपुते यांचे स्वागत केले होते. दरम्यान त्यांच्या या टीकेला सातपुते यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. आ. प्रणिती शिंदेजी, जय श्रीराम...! मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल, तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. मी ज्या भाजपचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढे वर्ष राजकारण केले आहे, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेने आता चांगलेच ओळखले आहे, असा टोला राम सातपुते यांनी लगावला.

Advertisement
Tags :
congressMLA Praniti ShindeMLA Ram SatputTbdnews
Next Article