For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला 'रामराम'...काही तासात भाजपला 'जय श्रीराम' म्हणणार ?

01:37 PM Feb 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला  रामराम    काही तासात भाजपला  जय श्रीराम  म्हणणार
Congress MLA Ashok Chavan

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील मातब्बर नेते अशोक चव्हाण यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या केंद्रिय नेत्यांना धक्का दिला आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाबरोबरच आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण काही तासामध्ये भाजप प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून राजकिय क्षेत्रात मोठी चर्चा असलेल्या काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज आपल्या पक्षाला शेवटी रामराम ठोकला आहे.काँग्रेसच्या कार्यकाळात मुख्य़मंत्री राहीलेले अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रिय नेतृत्वाला मोठा धक्का बसला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

अशोक चव्हाण हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून ते लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. भाजपच्याही नेत्यांकडून याला दुजोरा दिला जाऊन काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये लवकरच येणार असल्याचं बोलण्यात येत होतं. तसेच अशोक चव्हाण यांच्याबरोबर अनेक आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

आज अखेर अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देऊन काँग्रेसबरोबर आपले नाते तोडले. तसेच अशोक चव्हाण आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत भाजप प्रवेश करणार असल्याची माहीती सुत्रांनी सांगितली आहे. अशोक चव्हाण यांनी जर भाजप मध्ये प्रवेश केला तर त्यांना राज्यसभेच्या एका जागेचं तिकिट देण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. या पक्षप्रवेशावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या...?असे म्हणून यापुढे ही मोठ्या राजकिय घडामोडी घडणार असल्याचे सुतोवाच दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.