महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सक्ती’मध्ये काँग्रेस नेत्याची प्रतिष्ठा पणाला

05:22 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छत्तीसगड विधानसभेचे अध्यक्ष आणि सक्ती मतदारसंघाचे आमदार अन् काँग्रेसचे उमेदवार चरणदास महंत यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीची परंपरा मोडण्याचे आव्हान आहे. राज्याच्या स्थापनेनंतर झालेल्या 4 निवडणुकांमध्ये येथील जनतेने दर 5 वर्षानी स्वत:चे नेतृत्व करणाऱ्या पक्षाला बदलले आहे. सक्ती मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष महंत यांना मैदानात उतरविले आहे. येथे त्यांच्यासमोर भाजपचे खिलावन साहू यांचे आव्हान आहे. महंत हे राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. महंत यांनी आतापर्यंत तीनवेळा लोकसभा खासदार आणि चारवेळा आमदार म्हणून काम केले आहे.

Advertisement

2003 च्या निवडणुकीत सक्ती मतदारसंघात भाजपचे मेधाराम साहू विजयी झाले होते. तर 2008 मध्ये काँगेसचे सरोज मनहरण राठौड यांनी यश मिळविले होते. अशाच प्रकारे 2013 च्या निवडणुकीत पुन्हा बदल झाला आणि भाजपचे खिलावन साहू हे निवडून आले. 2018 च्या निवडणुकीत येथील जनतेने पुन्हा बदल घडवत स्वत:चे नेतृत्व चरणदास महंत यांच्या हाती सोपविले होते.

Advertisement

अशा स्थितीत चरणदास महंत हे या मतदारसंघाची परंपरा मोडण्यास यशस्वी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सक्ती मतदारसंघात महंत यांच्यासाठी पक्षातील काही नेत्यांची नाराजीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पक्षांतर्गत नाराजी कायम राहिल्यास महंत यांचा विजयाचा मार्ग अवघड ठरणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article