For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस नेत्याची पाकला क्लिनचिट

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस नेत्याची पाकला क्लिनचिट
Advertisement

लोकसभा निवडणूक अधिकाधिक रंगत चालली असतानाच नेत्यांच्या त्यांच्या जीभेवरचा ताबाही जास्त जास्त सुटत चालल्याचे दिसत आहे. भारतीयांना चीनी, निग्रो, अरब आदी म्हणणाऱ्या विदेशस्थ काँग्रेस नेत्याला त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे राजीनामा द्यावा लागला असतानाच आता 2019 मध्ये घडलेल्या पुलवामा हल्ल्यासंबंधी एका काँग्रेस नेत्याने पाकिस्तानला क्लिनचिट दिल्याने वातावरण तापले आहे. काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील फरीदाबाद मतदारसंघातील उमेदवार महेंद्र प्रताप सिंग यांनी अशा अर्थाची टिप्पणी केली आहे. पुलवामा हल्ल्यासंबंधीचे सत्य सत्यपाल मलिक यांनी बाहेर काढले आहे. ज्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या बसवर हल्ला झाला, त्या सैनिकांना विमानाने जाऊ द्या, अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी ती मानली नाही, असा आरोप मलिक यांनी केला होता. या आरोपाचा संदर्भ देत सिंग यांनी पाकिस्तानला क्लिनचिट दिल्याचा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाचे नेते विष्णुवर्धन रे•ाr यांनी प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ एका प्रचार सभेतील आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत चन्नी यांनी नुकताच झालेल्या पूंछ येथील वायुतळावर झालेला दहशतवादी हल्ला हा भारत सरकारचा राजकीय स्टंट आहे, अशी वादग्रस्त भाषा केली होती.

Advertisement

वडेट्टीवारांचेही विधान

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यासंबंधी काँग्रेस नेते वटेट्टीवार यांचे विधानही अत्यंत वादग्रस्त ठरले होते. त्या हल्ल्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी दलाचे प्रमुख हेमंत करकरे हे त्यांच्या अन्य दोन अधिकाऱ्यांसह दहशतवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडले होते. मात्र, त्यांना दहशतवाद्यांनी मारले नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेल्या पोलिसांनीच मारले, असा आरोप वडेट्टीवार यांनी माजी पोलिस अधिकारी हुसेन यांचा संदर्भ देऊन केला होता.

Advertisement

काँग्रेसची कोंडी

काँग्रेस नेत्यांकडून संवेदनशील विषयांवर सातत्याने वादग्रस्त विधाने होत असल्याने ऐन निवडणुकीच्या भरात काँग्रेसची कोंडी होत आहे. प्रत्येकवेळी काँग्रेसला सारवासारवी करावी लागत आहे. तसेच हे संबंधित नेत्याचे व्यक्तीगत विधान आहे. काँग्रेसचा याच्याशी संबंध नाही अशी मखलाशी करावी लागत आहे. सनातन धर्मासंबंधीही काँग्रेसच्या मित्रपक्षाच्या काही नेत्यांनी अवमानजनक उद्गार काढल्याच्या प्रकारामुळे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसची अडचण झाली होती.

Advertisement
Tags :

.