For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस नेते सुनील केदार यांचा शिवसेनेकडून निषेध ! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत केलेल्या वक्तव्या विरोधात निदर्शने

04:21 PM Sep 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
काँग्रेस नेते सुनील केदार यांचा शिवसेनेकडून निषेध   मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत केलेल्या वक्तव्या विरोधात निदर्शने
Shiv Sena Demonstrations Ladki Bahin Yojana
Advertisement

प्रतिमेस जोडे मारत संताप केला व्यक्त

कोल्हापूर प्रतिनिधी

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद पाडण्यासाठी खटाटोप करणाऱ्या सुनील केदार यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत शिवसेना शिंदे गट महिला आघाडीने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध केला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केदार यांच्या प्रतिमेस जोडे मारत संताप व्यक्त केला.

Advertisement

याप्रसंगी बोलताना लाडकी बहिण योजना कोल्हापूर उत्तर प्रमुख पवित्र रांगणेकर म्हणाल्या, काँग्रेस नेते सुनील केदार यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद पाडण्याच्या खटाटोप सुरु आहे. योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे विरोधकांना पोटशुळ उठली आहे. महायुती सरकारने योजना राबविताना पक्षभेद न करता सर्वसमावेशक महिलांना योजनेचा लाभ दिला आहे. तरीही विरोधकांकडून योजनेबाबत महिलांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रांगणेकर यांनी केला. यावेळी मंगल साळोखे, पुजा भोर, अमरजा पाटील, प्रिती अतिग्रे, मंगल कुलकर्णी, राधिका पारखे, पुजा शिंदे, पुजा पाटील, गीता भंडारी, पुजा कामते, सुनीता भोपळ, कविता कोंडेकर आदींसह महिला शिवसैनिक उपिस्थत होत्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.