काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
तामिळनाडुच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हॅलिकॉप्टरची झडती घेतली. या हॅलिकॉप्टरने राहुल गांधी तामिळनाडूमधून केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होते. सोमवारी सकाळी राहुल गांधी आपल्या हॅलिकॉप्टरने निलगिरीत उतरले. यावेळी अचानक निवडणूक अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हॅलिकॉप्टपची तपासणी सुरु केली. राहुल गांधी प्रचारासाठी आपल्या वायनाड मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी जात होते. 2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) उमेदवार के एनी राजा यांच्याशी होणार आहे. विशेष म्हणजे के एनी राजा हे INDIA आघाडीतील मित्र पक्षातले आहेत. याशिवाय वायनाड मतदारसंघात भाजपचे के सुरेंद्रन यांचंही राहुल गांधी यांना आव्हान आहे. 20 लोकसभा जागा असलेल्या केरळात एकाच टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. तर तामिळनाडुतल्या 39 जागांसठी 19 एप्रिलला मतदान होईल.