काँग्रेस नेते कुमारी अनंथन यांचे निधन
भाजप नेत्या सुंदरराजन यांचे पिता
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील भाजप नेत्या तमिळसाई सुंदरराजन यांचे पिता आणि वरिष्ठ काँग्रेस नेते कुमारी अनंथन यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. तामळिनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि द्रमुक खासदार कनिमोझी यांनी अनंथन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांनी देखील कुमारी अनंथन यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.
पु•gचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी आणि माजी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी काँग्रेस नेते कुमारी अनंथन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. अनंथन हे तमिळ भाषेचे चॅम्पियन होते. तमिळ भाषा, संस्कृती आणि तमिळांच्या कल्याणाच्या प्रचार-प्रसारात अनंथन यांनी मोठे योयदान दिले तसेच ते एक महान देशभक्त होते असे उद्गार रंगासामी यांनी काढले आहेत.
अनंथन यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे दिग्गज नेते के. कामराज यांच्याशी निकटचे संबंध होते. अनंथन यांनी तमिळ भाषेच्या प्रचार-प्रसारात मोठे योगदान दिले असल्याचे नारायणसामी यांनी म्हटले आहे.