तामिळनाडूत काँग्रेस नेत्याची जाळून हत्या
विशेष पथकाकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ तिऊनेलवेली
तामिळनाडूतील तिऊनेलवेली येथे शनिवारी जिल्हा काँग्रेसचा एक नेता मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. केपीके जयकुमार धनसिंग असे मृतावस्थेत सापडलेल्या जिल्हा काँग्रेस नेत्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच ही हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करत तपास सुरू केला आहे.
केपीके जयकुमार धनसिंग यांचा अर्धा जळालेला मृतदेह त्यांच्या शेतात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. धनसिंग यांनी अलीकडेच आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केल्यानंतर ही घटना उघड झाली आहे. धनसिंग हे काँग्रेसच्या तिऊनेलवेली (पूर्व) युनिटचे प्रमुख होते. दरम्यान, तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे (टीएनसीसी) प्रमुख के. सेल्वापेऊन्थगई यांनी पक्ष सहकाऱ्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत घटनेचा योग्य तपास करण्याची मागणी केली आहे.