महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसने दिलेले वचन पाळले

11:22 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, रामदुर्ग बंजारा समाज बांधवांचा मेळावा

Advertisement

बेळगाव : काँग्रेस पक्षाकडून दिलेले वचन नेहमीच पाळले आहे. राष्ट्र आणि जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना अत्याधिक मताने विजयी करावे, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव लोकसभा मतदार संघात येणाऱ्या रामदुर्ग विधानसभा मतदार संघामध्ये बन्नूर तांडा व परिसरात प्रचार करून बंजारा समाजाच्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षाला मत देणे आवश्यक आहे. यासाठी मतदारांनी यावेळी उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस सरकारकडून नेहमीच गोर-गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार पाच गॅरंटी योजना राबवून सरकार गोर-गरिबांच्या बाजूने असल्याचे दाखवून दिले आहे. गरीब, श्रमिक शेतकरी यांचा विकास होणे आवश्यक आहे. महिलांचे आर्थिकरित्या सबलीकरण करून स्वावलंबी जीवन जगण्यास प्राधान्य दिले जात आहे. यासाठी मतदारांनी सरकारच्या योजनांची दखल घेऊन पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

सिद्धरामय्या यांचे हात अधिक बळकट करण्यास सहकार्य करा

बाहेरुन आलेल्या उमेदवारांकडून आपली कर्मभूमी असल्याचे सांगितले जात आहे. अशा कोणत्याच उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता मतदारांनी काँग्रेसला मतदान करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हात अधिक बळकट करण्यास सहकार्य करावे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नेहमीच समाजातील तळागाळातील जनतेसाठी कार्य केले आहे. यापुढेही त्यांचे समाजकार्य कायम असणार असून सरकारने सुरू केलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article