For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गरिबांचा विकास करणारा पक्ष काँग्रेसच

10:50 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गरिबांचा विकास करणारा पक्ष काँग्रेसच
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : अरभावी मतदारसंघात जोरदार प्रचार

Advertisement

बेळगाव : गरिबांचा विकास, महिलांच्या सबलीकरणासाठी चिंतन करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला बहुमताने निवडून देऊन राज्य सरकारचे हात बळकट करण्यात यावेत, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या अरभावी विधानसभा मतदारसंघात लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अरभावी येथील अंजनेय देवस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे. मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यात यावा. अरभावी मतदारसंघातून मिळालेला प्रतिसाद विजयाचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्याकडून बेळगाववर नेहमीच अन्याय करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला. बेळगावसाठी येणारे आयआयटी महाविद्यालय, विमानतळ विस्तरीकरण योजना अडवून धरून त्या हुबळी-धारवाड येथे राबविल्या आहेत. कोरोना काळात बेळगावसाठी आलेले ऑक्सिजन सिलिंडर हुबळी-धारवाडसाठी नेण्यात आले आहेत. याला शेट्टर कारणीभूत असल्याचा आरोप मंत्री हेब्बाळकर यांनी केला. यावेळी भीमाप्पा हंदीगुंद, अनिलकुमार दळवाई, कौजलगी ब्लॉक अध्यक्ष प्रकाश अरळी, रमेश उटगी, लक्ष्मण सवसुद्धी, बाबु जमखंडी, गणपती इडीगेरी, मारुती आलोशी आदी ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.