For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसला अथणी मतदारसंघातून अधिक मतदान मिळण्याची अपेक्षा

11:27 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेसला अथणी मतदारसंघातून अधिक मतदान मिळण्याची अपेक्षा
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळी : ऐगळी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा

Advertisement

बेळगाव : अथणी मतदारसंघातून चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना अपेक्षेपेक्षा अधिक मतदान मिळणार आहे, असे जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. अथणी तालुक्यातील ऐगळी क्रॉस येथे आयोजित करण्यात आलेल्या तेलसंग, ऐगळी जिल्हा पंचायत व्याप्तीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. स्थानिक आमदार, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तालुक्यात पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे अनुदान दिले आहे. काँग्रेस पक्षाकडून विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. निवडणुकीला मोजकेच दिवस असून मतदारांनी बुथ पातळीवर दिवस-रात्र परिश्रम घेऊन उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार लक्ष्मण सवदी म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून 2 हजार कोटी  रुपये दिले आहेत. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या मतदारसंघावर अधिक विश्वास ठेवला असून प्रियांका जारकीहोळी यांना विजयी करून त्यांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस नेते सदाशिव बोटाळे म्हणाले, अथणी मतदारसंघातून 80 हजारांपेक्षा अधिक मतदान दिले जाईल. मतदारसंघात इतर कोणीच विरोध करीत नसल्याचे दिसून येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी तेलसंग ब्लॉक अध्यक्ष अमोघ कुबरी, गजानन मंगसुळी, अनिल सुळेभावी, चिदानंद मुगळी, शेखर नॅमगौड, राजू सलीम, रजाक मुल्ला, निकिता गदाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.