For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

काँग्रेस ‘सत्यशक्ती’च्या बाजूने; भाजप ‘असत्या’कडे

10:41 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस ‘सत्यशक्ती’च्या बाजूने  भाजप ‘असत्या’कडे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप : तानावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल

Advertisement

पणजी : आमचे नेते राहुल गांधी हे नेहमी ‘सत्याच्या शक्ती’च्या बाजूने राहिलेले आहेत. त्याऊलट भाजपने नेहमीच असत्याचे दर्शन घडवलेले आहे. त्यामुळेच कदाचित गोव्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना फक्त ‘असत्याची शक्ती’ माहीत असावी, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गिते व मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा  यांच्याकडे भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याविरोधात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी तक्रार दाखल केली. यावेळी उत्तर गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, सांताक्रुझ काँग्रेस गटाचे अध्यक्ष जॉन नाझारेथ, महिला पणजी काँग्रेस गटाच्या अध्यक्षा लविना डिकॉस्टा, जोझ कार्मिलो, इक्बाल शेख उपस्थित होते. तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर यांनी सांगितले की, 2014 मधील निवडणुकीत भाजपतर्फे नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काळा पैसा देशात परत आणण्याचे वचन दिले होते. वर्षाला 2 हजार नोकऱ्यांची निर्मिती देण्याचे आश्वासन दिले होते. महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या दहा वर्षांत जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न करता देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यात आणि विरोधकांवर सरकारी यंत्रणाकरवी दबाव आणण्याचेच काम भाजपने केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.