For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोले तैसा चाले, काँग्रेसने दाखवून दिले

11:00 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोले तैसा चाले  काँग्रेसने दाखवून दिले
Advertisement

उमेदवार मृणाल हेब्बाळकर : गोकाक मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : बोले तैसा चाले, या चालीप्रमाणे काँग्रेस सरकारने गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन पाळले आहे. पाच गॅरंटी योजना राज्यभरात समर्पकपणे राबविल्या जात आहेत. यासाठी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन बेळगाव लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी केले. गोकाक येथे विविध भागात प्रचार करून कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. येत्या मे 7 रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असून मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावर मतदान करून पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास अनेक विकासाभिमुख योजना राबविल्या जाणार आहेत. या भागाचा संपूर्ण विकास केला जाईल. केवळ निवडणुकीच्या तोंडावर येऊन गाठीभेटी घेणाऱ्या भाजप उमेदवारांना जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून योग्य धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले. बाहेरून आलेल्या उमेदवाराला योग्य जागा दाखवून द्या, स्थानिक उमेदवार म्हणून आपल्याला पाठिंबा द्या, असे आवाहनही त्यांनी केले. गोकाक मतदारसंघातील मक्कळगेरी, मालिद्दिनी, उप्पारहट्टी, मरडीशिवापूर आणि ममदापूर गावांमध्ये प्रचार करून त्यांनी मतदारांना आवाहन केले. मतदारांकडूनही  त्यांना भरघोस पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्या तेजस्विनी गौड, डॉ. महांतेश कडाडी, स्थानिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.