महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा

06:47 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यसभा निवडणुकीत युतीचा उमेदवार पराभूत : भाजप आमदार सोमशेखर यांचे क्रॉस व्होटींग, हेब्बार गैरहजर

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

तीव्र कुतूहल निर्माण झालेल्या कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचा एक उमेदवार निवडून आला असून भाजप-निजद युतीतर्फे निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलेल्या  पाचव्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा झालेला हा दुसरा पराभव आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये क्रॉस व्होटींग होईल, असा दावा करणाऱ्या भाजपलाच क्रॉस व्होटींगचा धक्का बसला आहे. भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. तर आमदार शिवराम हेब्बार यांनी गैरहजर राहून मतदानापासून अलिप्त भूमिका घेतली.

राज्य विधानसभेरून राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 222 आमदारांनी मतदान केले. सर्व मते वैध ठरली. काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना 47 मते, सय्यद नासीर हुसेन यांना 47 मते आणि जी. सी. चंद्रशेखर यांना 45 मते मिळाली. तर भाजपचे नारायणसा भांडगे यांना 47 मते मिळाली. परंतु, भाजप-निजद युतीचे उमेदवार कुपेंद्र रे•ाr यांना केवळ 36 मते पडली. कुपेंद्र रे•ाRना भाजपची अतिरिक्त 17 आणि निजदची 19 मते मिळाली. विजय मिळण्यासाठी 45 मते आवश्यकता होती. या निकालामुळे भाजप आणि निजद नेत्यांचे राजकीय गणित फोल ठरले आहे.

अनेक राजकीय गणिते मांडून युतीतर्फे पाचवा उमेदवार उभा करण्यात आला होता. त्यामुळे साहजिकच सत्ताधारी काँग्रेसला क्रॉस व्होटींगची चिंता लागली. अपक्ष, इतर पक्ष आणि काँग्रेसच्या काही उमेदवारांची मते मिळवून कुपेंद्र रे•ाr यांना निवडून आणण्याचे प्रयत्न भाजप-निजदने केले. पक्षातील मते फुटू नयेत, यासाठी वेळीच सावध झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्वत:ची योजना तयार केली. त्यानुसार पक्षातील सर्व आमदारांबरोबरच अपक्ष आणि भाजपचे मत आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी ठरले. भाजपचे शिवाराम हेब्बार यांना मतदानापासून दूर ठेवण्यात काँग्रेसने केलेले प्रयत्नही फलद्रुप ठरले.

अपक्ष, इतर पक्षाची 4 मतेही काँग्रेसच्या पारड्यात

केआरपीपी पक्षाचे आमदार जनार्दन रे•ाr, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे आमदार दर्शन पुट्टणय्या तसेच अपक्ष आमदार लता मल्लिकार्जुन आणि पुट्टस्वामी गौडा यांनीही काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देत मतदान केले. भाजपचे यशवंतपूर मतदारसंघाचे आमदार एस. टी. सोमशेखर यांनीही काँग्रेसच्या उमदेवाराला मतदान केले. शिवाय काँग्रेसमधून कोणीही क्रॉस व्होटींग न केल्याने काँग्रेसचे तिन्ही उमेदवार सहज विजयी झाले.

भाजप-निजद युतीला सोमशेखर, हेब्बार यांचा धक्का

काँग्रेस उमेदवाराला मतदान केलेल्या आमदार एस. टी. सोमशेखर यांनी मी माझ्या विवेकबुद्धीने मतदान केले आहे. ज्याला मतपत्रिका दाखवावी लागते, त्याला मतपत्रिका दाखवूनच मतदान केले आहे, असे सांगून त्यांनी भाजप-निजद युतीलाच श•t ठोकला. जे माझ्या मतदारसंघासाठी अनुदान देतात, त्यांनाच मत दिले आहे. मागील निवडणुकीत निर्मला सीतारामन यांना मतदान केले होते. मात्र त्यांनी खासदार फंडातून अनुदान दिले नाही. त्यामुळे अनुदान मिळण्याचा विश्वास असलेल्या उमेदवाराला मतदान केल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे त्यांनी काँग्रेसमधून पुन्हा राजकीय वाटचाल करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मतदानापासून दूर राहिलेल्या आमदार शिवराम हेब्बार यांनीही भाजप-निजद युतीला धक्का दिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article