राज्यासह देशात काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाणार; काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची स्पष्टोक्ती
अशोक चव्हाण यांच्या काँग्रेसमधील राजीनाम्यानंतर स्पष्ट केली भूमिका
कोल्हापूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानंतर मंत्री पद कोणा-कोणाला मिळाले ? हे सर्वश्रुत आहे. मंत्री मंडळाचा विस्तार झाला नसल्याने भाजपमधील अंतर्गत खदखद मोठ्या प्रमाणात वाढली असून आणखी वाढणार आहे. विधान परिषदेच्या जागा अजून जाहीर झालेल्या नाहीत. राज्यसभेच्या जागावरुन भाजपची भूमिका लक्षात येणार आहे. यामध्ये भाजप मूळ लोकांना संधी देणार की बाहेरून आलेल्यांना संधी देणार हे लवकरच समजणार आहे. महाराष्ट्र आणि देशात काँग्रेचा झेंडा पुढे घेवून जाण्याची जबाबदारी आता दुसऱ्या फळीतील नेत्यांवर आली आहे. काँग्रेसची ही लढाई निश्चितपणे जीवंत ठेवणार असल्याची स्पष्टोक्ती आमदार सतेज पाटील यांनी केली.
काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: कोल्हापूरातील आणखी काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालयात पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका विशद करून चर्चेला पूर्णविराम दिला.
सर्व्हेतील काँग्रेसच्या यशामुळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
आमदार सतेज पाटील म्हणाले, महाराष्ट्रात झालेल्या विविध सर्व्हेमधून लोकसभेत काँग्रेससह महाविकास आघाडीला 25 ते 26 जागा मिळतील असा कौल स्पष्ट केला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी बद्दलचे हे सकारात्मक वातावरण बिघडण्याचे भाजपकडून काम सुरु आहे. महाविकास आघाडीकडून जनेतच्या आपेक्षा असून महायुतीच्या कारभारावर नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाचे नूकसान होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या राजीनाम्याचे काय कारणे आहेत ? हे अद्याप समजलेले नाही. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र आलेल्या प्रसंगाला तोंड देवून पुढे गेले पाहिजे. बुधवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली शकते. आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे गटनेते म्हणून मुंबई येथे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी बैठक होणार आहे.
आणखी आमदार जातील यात तथ्य नाही
राज्यातील वीस ते बावीस आंमदारांसोबत स्वत: बोललो आहे. ते कोठेही जाणार नाहीत. याशिवाय पक्षाचे इतर नेतेही बोलत आहेत. हे सर्व आमदार काँग्रेससोबतच आहेत. त्यामुळे आणखी कोणी जातील असे वाटत नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सर्व आमदारांना एकसंघ ठेवण्याची जबाबदारी
राज्यातीन काँग्रेसच्या वरिष्ठनेत्यांनी राज्यातील सर्व आमदारांशी चर्चा करण्याची जबबादारी माझ्यावर सोपवली आहे. त्यानूसार सोमवारी दिवसभर त्यांच्यासोबत चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली आहेत. यामध्ये अशोकराव चव्हाण यांच्यासोबतचे चार ते पाच आमदार वगळता अन्य कोणी आमदार काँग्रेस सोडून जाणार नाहीत, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
महायुतीचा कारभार लोकांना मान्य नाही
महायुतीचा कारभार लोकांना मान्य नाही. लोकसभेचा मुड वेगळा दिसतो, महाराष्ट्रातील मूड वेगळा आहे. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र असणे काळाजी गरज आहे असे आमदार पाटील नमूद केले.