महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसचे कुटुंब म्हणजे भ्रष्ट कुटुंब

06:55 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाही कुटुंब असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात

Advertisement

नागपूर :

Advertisement

आज देशात सर्वात बेईमान आणि सर्वाधिक भ्रष्ट पक्ष कुठला असेल, तर तो काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब कुठले असेल, तर ते काँग्रसचे शाही कुटुंब आहे. ज्या पक्षात आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा थोडासाही सन्मान केला जात असेल, तर तो पक्ष कधी गणपती पूजेचा विरोध करू शकत नाही, अशा कडक   शब्दात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रसवर घणाघात केला. पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पेंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पेंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

तुम्ही बघा, आज काँग्रेसच्या लोकांची भाषा, त्यांचे बोलणे, परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधातील अजेंडा, समाजाला तोडणे, देशाला तोडण्याची भाषा करणे, भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा अपमान करणे, ही ती काँग्रेस आहे, जिला तुकडे -तुकडे गँग आणि अर्बन नक्सल चालवत आहेत असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसला गणपती पूजेबद्दल चीड

‘आजची काँग्रेस गणपती पूजेचाही तिरस्कार करते. महाराष्ट्राची भूमी साक्षीदार आहे की, स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांच्या नेतफत्वात गणपती उत्सव महाराष्ट्राच्या एकात्मतेचा उत्सव बनला होता. गणेश उत्सवात प्रत्येक समाज, प्रत्येक वर्गातील लोक एकत्र येत होते. त्यामुळे काँग्रेसला गणपती पूजेबद्दल चीड आहे’, असा आरोप मोदींनी केला.

पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे भारताचे स्वप्न साकारणारा रोडमॅप

पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ’सप्लाय चेन‘सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पारंपरिक कौशल्याचा सन्मान

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समफध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट कऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिकनागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिरांचा समावेश आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच पुरवठा साखळी सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

कारागिरांना प्रमाणपत्र, धनादेशाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास पेंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्वाची : मुख्यमंत्री

देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करण़ाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्राsद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतक़र्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article