महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस, द्रमुकला विकासाची फिकिरच नाही : मोदी

06:42 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

थूथुकुडीमध्ये 17,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण : रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण अन् दुहेरीकरण

Advertisement

► वृत्तसंस्था/ थूथुकुडी

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी तामिळनाडूच्या थूथुकुडीमध्ये 17,300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण केले आहे. यात देशातील पहिले हायड्रोजन हब प्रकलप आणि इनलँड वॉटर वे वेसल सामील आहे. या वेसलची निर्मिती हरित नौका पुढाकाराच्या अंतर्गत करण्यात आली आहे. याचबरोबर पंतप्रधानांनी वीओ चिदंबरनार बंदरावर आउटर हार्बर कंटेनर टर्मिनलच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. यावेळी एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेस आणि द्रमुकला देश अन् जनतेच्या विकासाची फिकिरच नसल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधानांनी 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75 लाइट हाउसेसमधील पर्यटक सुविधा देखील देशाला समर्पित केल्या आहेत. याचबरोबर 1477 कोटी रुपयांच्या निधीतून निर्मित कन्याकुमारी, नागरकोइल आणि तिरुनेलवेली ते चेन्नईपर्यंतचे रेल्वे प्रकल्प आणि 4586 कोटी रुपयांच्या चार मार्ग प्रकल्पांचे त्यांनी लोकार्पण केले आहे.

तामिळनाडू आणि देशाच्या जनतेला एक सत्य सांगणे आवश्यक आहे. सत्य कटू असते, परंतु मी थेट यापूर्वीच्या संपुआ सरकारवर आरोप करू इच्छितो. जे प्रकल्प मी आज येथे सुरू करत आहे, त्याबाबत दशकांपासून येथील लोकांची मागणी होती. आज जे लोक तामिळनाडूत सत्तेवर आहेत, ते तेव्हा दिल्लीत सत्तेवर होते, सरकार आणि संबंधित विभाग द्रमुकचे नेतेच चालवत होते, परंतु द्रमुक आणि काँग्रेसच्या नेत्यांना विकासाची फिकिर नव्हती अशी टीका मोदींनी केली आहे.

ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे, ते विकसित भारताच्या रोडमॅपचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहेत. त्यांच्यात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना दिसून येते. आज भारतातील पहिली हायड्रोजन इंधन फेरी लाँच करण्यात आली आहे. ही फेरीबोट लवकरच काशीमध्ये गंगा नदीत चालणार आहे, हे एक प्रकारे तामिळनाडूच्या लोकांकडून काशीच्या लोकांना अत्यंत मोठी भेट असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

मेरीटाइम क्षेत्राचा विकास

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे आता भारत मेरीटाइम आणि जलमार्गाच्या क्षेत्रात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आगामी काळात मेरीटाइम क्षेत्राचा विकास अनेकपटीने वाढणार आहे आणि याचा तामिळनाडूच्या किनारी भागांवर मोठा प्रभाव पडणार आहे. यामुळे युवांना नोकरीच्या संधी प्राप्त होतील असे मोदींनी म्हटले आहे.

तामिळनाडूची मोठी भूमिका

देश सध्या विकसित भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी विकसित तामिळनाडूची भूमिका अत्यंत मोठी असणार आहे. तामिळनाडू आणि केरळदरम्यान रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण आणि त्याच्या दुहेरीकरणामुळे दोन्ही राज्यांदरम्यान संपर्कव्यवस्था वाढणार आहे. आज (बुधवारी) 5 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण केले असून यामुळे राज्यातील मार्ग संपर्कव्यवस्था वाढणार आहे, प्रवासासाठीचा वेळ घटणार असून पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळणार असल्याचा दावा मोदींनी केला आहे.

लाइटहाउसना पर्यटन केंद्राचे स्वरुप

विविध राज्यांमध्ये असलेल्या 75 लाइटहाउसमध्ये विकसित करण्यात आलेल्या पर्यटन सुविधांना बुधवारी देशाला समर्पित करण्यात आले आहे. जलमार्ग आणि सागरी क्षेत्राची आमच्या देशात दीर्घकाळापर्यंत उपेक्षा करण्यात आली होती. परंतु आता हेच विकसित भारतासाठी आधार ठरत आहेत. तामिळनाडू आणि दक्षिण भारताला याचा सर्वात मोठा लाभ मिळत असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article