For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे आजपासून नाशिकमध्ये प्रशिक्षण शिबीर; राहुल गांधींसह अनेक राष्ट्रीय नेते मार्गदर्शन करणार

10:57 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे आजपासून नाशिकमध्ये प्रशिक्षण शिबीर  राहुल गांधींसह अनेक राष्ट्रीय नेते मार्गदर्शन करणार
Advertisement

मुंबई: काँग्रेसच्या 'संघटन सृजन अभियान' अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विशेषमार्गदर्शन करणार आहेत. एमटीडीसी रिसॉर्टमध्ये हे शिबीर होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.