Satara News : साताऱ्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आले अन् कार्यालयासमोरच केला रस्तारोको
सातारा : रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस. त्याच दिवशी दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा आंदोलनाचा निरोप प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोहोचल्यानुसार पक्षाच्या कार्यालयासमोर नेहमीप्रमाणे आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. मागणी होती मनरेगा योजना बाचवा... आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली.
आंदोलनात रणजितसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अरबाज शेख, अन्वर पाशा खान, झाकीर पठाण,नजीम इनामदार, अॅड. विजयराब कणसे, राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम, रजनी पवार, भानुदास माळी, अमरजीत कांबळे, प्रा. सदाशिव खाडे, महेश साळुंखे, शंकर पवार, डॉ. संतोष कदम, अमर करंजे आदी सहभागी झाले होते.
५ देशमुख म्हणाले, जानेवारीपासून 'मनरेगा बचाव' मोहीम देशभर राबवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या मनरेगाविरोधी निर्णयांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. मनरेगा ही केवळ एक सरकारी योजना नसून भारतीय संविधानाने दिलेला कामाचा मूलभूत अधिकार आहे.