'देश बचाओ'सारखी यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवत आहे; अॅड. प्रकाश आंबेडकर
राजकीय न्याय हक्क निर्धार सभेला प्रतिसाद
इचलकरंजी प्रतिनिधी
महाविकास आघाडीशी युती व्हावी, अशी आमची भावना आहे. मात्र, काँग्रेसवाले कुरघोडी करणारे आहेत. ईडीची चौकशी लागते म्हणून भाजपाच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. काँग्रेसमधील घराणेशाहीचा फायदा नरेंद्र मोदी घेत आहेत. देश अजून तुटलेला नसून जुळलेला आहे. तरीही देश बचाओ सारखी यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवत आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ?ड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदानात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय न्याय हक्क निर्धार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
हेही वाचा >>> ज्यांच्याशी मैत्री करतो ती पुर्ण करतो...भाजपबरोबर लढावं, काँग्रेसचा नाद करू नये; वंचितला काँग्रेसचे प्रत्युत्तर
अॅड. आंबेडकर म्हणाले, भाजप लुटारू सरकार आहे, तर काँग्रेस भुरटे चोर आहेत. डाकूंच्या मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशावरील कर्ज 24 टक्क्यांवरुन 84 टक्क्यांपर्यंत नेले आहे. अशा कर्जात मोदी देशाला कायमचे बुडवून एक दिवस संन्यासाला जातील. त्यामुळे देश बुडवण्राया बेजबाबदार पंतप्रधानांना पुन्हा संधी देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एकीकडे बिघाड करत राज्यातील बडे काँग्रेसचे नेते सुपारी बहाद्दर झाले आहेत, अशा सुपारी बहाद्दरांना वेळीच आवर घातला नाही, तर लोकसभेनंतर सगळे जेलमध्ये जातील, असेही त्यांनी सांगितले. ?ड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत बोलताना ?ड. आंबेडकर पुढे म्हणाले, हातकणंगले लोकसभा निवडणुकीत गतवेळी 1 लाख 30 हजार मते मिळाली. आता प्रत्येकांनी 5 मतांची जबाबदारी घेतली तर हा आकडा पाच लाखांवर जाईल आणि आपला उमेदवार निवडून येईल.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, सर्वजित बनसोडे, अनिल जाधव डॉ. क्रांती सावंत, प्रा. किसन चव्हाण, पुंडलिक कांबळे, प्रवत्ते गोविंद दळवी, फारुक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती.