नगरपालिका निवडणूकीत काँग्रेस उमेदवार रिंगणात उतरवावेत
ॲड. दिलीप नार्वेकर यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन ; काँग्रेसची बैठक संपन्न
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिका निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उभे केले जातील. त्या दृष्टीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करावी. यासाठी पक्षाकडे मागणी अर्जाद्वारे व पक्ष देईल त्या निर्णयाशी बांधिल राहून वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य करावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे नेते व माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी केले. तर काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री महेंद्र सांगेलकर यांनी महाविकास आघाडी संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून तालुका काँग्रेस महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील आहे. परंतु महाविकास आघाडी न झाल्यास आपल्याला स्वतंत्रपणे लढावे लागेल.म्हणून शहरातील प्रत्येक वॉर्डनिहाय बैठकांचे आयोजन करून त्यातील इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज व नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज शहर काँग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्याकडे देऊन पक्षाचे निरीक्षक यांच्यामार्फत येत्या 10 दिवसांमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटी यांना पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे करीत असताना जे कार्यकर्ते पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे स्पष्ट केले. सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक श्री महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बासिप पडवेकर, जास्मिन लक्षमेश्वर, उपाध्यक्ष शिवा गावडे, अरुण नाईक, सरचिटणीस रुपेश अहिर,संजय राऊळ, ओबीसी शहर अध्यक्ष संतोष मडगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सौ सुमेधा सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य माया चिटणीस, स्मिता टिळवे, निषाद बुरान, जहिरा खान, बाळा नमशी, ज्ञानेश्वर पारधी, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, विल्यम सालदाना, ग्रेगरी डान्टस, लक्ष्मण भुते, विनायक नमशी, श्याम सावंत, किशोर राणे, रफिक नाईक, समीर वंजारी, शुभू नाईक, समीर भाट, गणपत मांजरेकर, आनंद कुंभार, मिनिन गोम्स, विनोद मल्हार, शरद गावडे, बबन डिसोजा, दीपक कदम, सत्यवान शेडगे, मिलिंद सुकी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या बैठकीचे आभार श्री अरुण भिसे यांनी मानले.