For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत काँग्रेसचा प्रचार शुभारंभ व पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

01:45 PM Jan 05, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत काँग्रेसचा प्रचार शुभारंभ व पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Advertisement

                                        सांगली प्रभाग 15 झालं काँग्रेसमय

Advertisement

सांगली : सांगली महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आणि भव्य पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सिव्हिल रोडजवळील गारपीर दर्ग्यात गुलाबपुष्प अर्पण करून व श्रीफळ फोडून प्रचाराला श्रीगणेशा करण्यात आला. खासदार विशाल (दादा) पाटील यांनी स्वतः पदयात्रेत सहभागी होत चौका–चौकात कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी जोरदार घोषणाही दिल्या. खासदार पाटील यांनी बोलताना “सांगली महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि भक्कम विकासकामे करण्यासाठी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या,” असे आवाहन केले.
पदयात्रेदरम्यान जेसीबीवरून फुलांची उधळण करण्यात आली. मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, स्मिता यमगर आणि सोनल पाटील या काँग्रेस–महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांसह महिलांचा मोठा सहभाग व प्रचंड जनसागर लाभला.

Advertisement

केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनता पुन्हा साथ देईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. या प्रचाराने प्रभाग 15 काँग्रेसमय झाल्याचे चित्र दिसून आले.

Advertisement
Tags :

.