For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसआयआरमधून नावे वगळल्याने काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले

07:50 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसआयआरमधून नावे वगळल्याने काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडले
Advertisement

मुस्लीम मतदारांची नावे वगळल्याचा काँग्रेसचा आरोप, शहरात तणावाचे वातावरण

Advertisement

त. भा. प्रतिनिधी /बेळगाव

मतदार फेरनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील कागदपत्रांच्या पडताळणीवेळी मतदारयादीतील नावे वगळल्यावरून शहरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याची घटना मंगळवारी घडली. आरोप, प्रत्यारोपावरून सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू होती. मनपाचे उत्तर विभागाचे निवडणूक अधिकारी उदयकुमार तळवार यांनी तातडीने भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली.

Advertisement

शहरातील वीरभद्रनगर येथे एका ऊर्दू शाळेत एसआयआर प्रक्रियेतील उर्वरित मतदारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या प्रक्रियेवेळी मुस्लीम मतदारांना लक्ष करून मतदारयादीतून मोठ्या संख्येने नावे वगळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे युवानेते अमन सेठ यांनी केला. त्यांनी डॉ. रवी पाटील यांच्यावर आरोप करीत मुस्लीम मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले. डॉ. रवी पाटील यांनी आपल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा वापर करून 200 हून अधिक अर्ज भरून घेतले. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव घातल्याचा आरोप त्यांनी केला.

या गोंधळानंतर काहीवेळातच त्या ठिकाणी भाजपचे नेते मुरुगेंद्रगौडा पाटील व भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी धाव घेतली. या पाठोपाठ दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने वीरभद्रनगर परिसरात दाखल झाले. वाढत्या गोंधळामुळे मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी पोलीस बंदोबस्तात वाढ केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोन्ही पक्षांच्या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच अर्ज पडताळणीमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे ऐन गणेशोत्सवात शहरातील वातावरण तापल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.