For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींना ‘राष्ट्रीय शर्म’ संबोधिल्याने काँग्रेस संतप्त

06:11 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींना ‘राष्ट्रीय शर्म’ संबोधिल्याने काँग्रेस संतप्त
Advertisement

मुख्यमंत्री शिवराज यांच्या वक्तव्याविरोधात आमरण उपोषण

Advertisement

वृत्तसंस्था/ बूंदी

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ‘राष्ट्रीय शर्म’ म्हटले गेल्यावर आता राजकारण तापू लागले आहे. शिवराज यांच्या या टिप्पणीवर आक्षेप घेत बूंदी येथील काँग्रेस नेत्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.  परंतु निवडणूक विभागाने काँग्रेसची तक्रार फेटाळली आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी आता निवडणूक विभागाच्या विरोधात निदर्शने करण्याची तयारी चालविली आहे. शिवराज यांनी राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांना ‘राष्ट्रीय शर्म’ संबोधिले होते.

Advertisement

राजस्थान काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांनी निवडणूक आयोगाला याप्रकरणी लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवर नोटीस बजावली. परंतु बूंदी येथील प्रचारसभेत शिवराज यांनी केलेल्या टिप्पणीवर नोटीस बजावण्याऐवजी स्वत:चे अंग झटकले अशी टीका शर्मा यांनी केली आहे. संतप्त  काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात 30 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
Tags :

.