ज्यांच्याशी मैत्री करतो ती पुर्ण करतो...भाजपबरोबर लढावं, काँग्रेसचा नाद करू नये; वंचितला काँग्रेसचे प्रत्युत्तर
काँग्रेस हे लुटारूंचं सरकार आहे असून काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते आहेत असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही पलटवार केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकरांवर भाष्य करण्याचं टाळून त्यांनी आम्ही ज्यांच्याशी दोस्ती करतो तेव्हा मी पुर्ण करतो असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी आंबेडकरांना लगावला. त्याचबरोबर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सहकारी पक्षांनी काँग्रेसच्या नादाला लागू नये असा इशारा दिला आहे.
हेही वाचा >>>काँग्रेस भुरटे चोर...तर भाजप लुटारूंच सरकार- अॅड. प्रकाश आंबेडकर
वंचित बहूजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागावाटपावरून घासाघीस चालू आहे. वंचित बहूजन आघाडीला किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीमध्ये दोन प्रवाह असून एक प्रवाह त्यांच्या 5 जागांच्या मागणीसाठी सकारात्मक आहे तर दुसरा प्रवाह वंचितला 3 जागांच्यावर जागा देऊ नये अशा विचाराचा आहे. वंचितला फक्त 3 जागा देण्यासाठी काँग्रेसमधील पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले तसेच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे एकमत आहे.
जागावाटपाच्य़ा काँग्रेस नेत्यांच्या या व्यवहारावरून प्रकाश आंबेडकर जास्तच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. इचलकरंजी येथे वंचित बहूजन आघाडीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी भाजपसह काँग्रेसवर आगपाखड केली. यावेळी बोलताना ते म्हणाले होते, "काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये एकी न होण्यासाठी सुपारी घेतली आहे. काँग्रेसमध्ये भुरटे चोर...असून भाजप हे लुटारूंचं सरकार आहे...देश तुटलेलाच नाही त्यामुळे भारत जोडो यात्रा करून काँग्रेस देशाला फसवत आहे." असा जहरी टिका त्यांनी केली होती.
प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या टिकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "प्रकाश आंबेडकरांवर मी कोणते ही भाष्य करणार नाही. पण तरीही आम्ही ज्याच्याशी मैत्री करतो ती पुर्ण करतो." असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.
यशोमती ठाकूर यांचाही 'वंचित'ला इशारा
या घडामोडीत काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनीही वंचितला इशारा दिला आहे. आपल्या एक्स या सोशलमीडीयावर पोस्ट लिहीताना त्यांनी, मित्रपक्षांनी भाजपबरोबर लढावं काँग्रेसचा नाद करू नये अशा आशयाची पोस्ट लिहून वंचितला एक प्रकारे इशाराच दिला आहे.