For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पदक विजेत्यांचे अभिनंदन

06:04 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
पदक विजेत्यांचे अभिनंदन
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

2026 च्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या भारतीय खेळाडंचे मान्यवरांकडून खास अभिनंदन करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन्, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी भारतीय पदक विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू-राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजन गटात मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या प्रिती पवारचे राष्ट्रपतींनी प्रसारमाध्यांवरून खास अभिनंदन केले आहे. तसेच या स्पर्धेत महिलांच्या 57 किलो वजन गटातील मुष्टियुद्ध क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या जस्मिन लंबोरियाच्या कामगिरीचे राष्ट्रपतींनी खास कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन् - 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्ध प्रकारात सुवर्णपदके मिळविणाऱ्या प्रिती पवार आणि जस्मिन लंबोरिया यांचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन् यांनी प्रसारमाध्यांद्वारे खास अभिनंदन केले आहे तसेच त्यांनी या स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या प्रवीण चित्रावेल तसेच कांस्यपदक मिळविणाऱ्या सेल्व्हा प्रभू यांचेही अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात दर्जेदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे. पुरुषांच्या डेकेथ्लॉन प्रकारात कांस्यपदक मिळविणाऱ्या तेजस्वीन शंकरच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेतील  विविध दहा क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांनी दर्जेदार कामगिरी केली असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुढील स्पर्धांकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रिय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया-राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विविध प्रकारात भारताला पदके मिळवून देणाऱ्या खेळाडूंचे पेंद्रिय क्रीडा मंत्री डॉ. मांडविया यांनी गास अभिनंदन केले आहे. मुष्टियुद्ध प्रकारात सुवर्णपदके मिळविणारी प्रिती पवारचे त्यांनी खास कौतुक केले असून या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.