सोहम भातकांडेचे अभिनंदन
वार्ताहर/हिंडलगा
सार्वजनिक शिक्षण खाते तसेच कर्नाटक सरकार मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील मुलांच्या खो-खो स्पर्धेत बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या खो-खो संघाने उपविजेतेपद संपादन केले. या संघातील उत्कृष्ट खेळाडू सोहम यल्लाप्पा भातकांडे याची राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूला शाळेचे मुख्याध्यापक एस .व्ही .बेन्नाळकर, क्रीडा शिक्षिका सुवर्णा सिद्धन्नवर, तसेच शाळा विकास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम तरळे ,माजी विद्यार्थी संघटना, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी येळगुकर यांच्यामार्फत प्रोत्साहन मिळाले असून या खो-खो संघाला प्रशिक्षण अरविंद मनोळकर यांनी दिल्याने या खेळाडूचे सर्वत्र अभिनंदन होत असून प्रथमच या शाळेच्या खेळाडूने राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतल्याने गावचे शाळेचे व खेळाडूचे अभिनंदन होत आहे.उत्तर प्रदेश येथे 3 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय खोखो स्पर्धेसाठी जाणार असल्याने गावच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत.