आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे वेंगुर्ल्यात अभिनंदन
शिवसेनेतर्फे सचिन वालावलकर, उमेश येरम यांनी केले स्वागत
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले शहरातील भटवाडी येथील मूळ रहिवासी असलेले राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी राजापूर मतदारसंघात प्रथमच लढविलेल्या विधानसभा लढवीत १९ हजाराच्या मताधिक्याने विजय प्राप्त केला. या विजयानंतर प्रथम कुलदेवतेचे दर्शनानिमित्त वेंगुर्लातील मूळ घरी आलेल्या भैय्या सामंत यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी वेदिका सामंत व पौर्णिमा सामंत यांनी भैय्या सामंत यांचे औक्षण केले.यावेळी शासकीय ठेकेदार विनय सामंत, सामाजिक कार्यकर्ते संग्राम सामंत, अलका सामंत, जयश्री सामंत, साईराज सामंत, सात्विक सामंत, शिवसेना शहर प -मुख उमेश येरम, अमर दाभोलकर, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत, अखिल आरोसकर, नागेश वेंगुर्लेकर, प्रणव प्रभु, योगेश गावडे, रघुनाथ म्हाडगूत, ओंकार देसाई, प्रीतम पवार, आदित्य खानोलकर, नपूर सामंत आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.