For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारिवडे उपसरपंच महेश गावकर यांचे युवानेते विशाल परब यांच्याकडून अभिनंदन

04:54 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कारिवडे उपसरपंच महेश गावकर यांचे युवानेते विशाल परब यांच्याकडून अभिनंदन
Advertisement

गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही

Advertisement

ओटवणे|प्रतिनिधी

कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या महेश गावकर यांचे भाजपाचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशाल परब व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारिवडे येथे जात महेश गावकर यांचे अभिनंदन केले. तसेच गावच्या विकासासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्याची ग्वाही महेश गावकर यांना दिली.यावेळी विशाल परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांचा सत्कार करीत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कारिवडे सरपंच आरती माळकर, तालुका उपाध्यक्ष अशोक माळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, केतन आजगांवकर, भाजपा आंबोली मंडळ युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, रवी सावंत, संतोष बिले, स्थानिक भाजपा पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.