महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विशाल बागायतदार यांचा अर्चना घारे- परब यांच्याकडून सत्कार

05:23 PM Nov 08, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मातोंड ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्याने दिल्या शुभेच्छा

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री. विशाल बागायतदार हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. सावंतवाडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी जनसंपर्क कार्यालयात त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित सदस्यांकडून सर्वसामान्य लोकांची सेवा घडो, ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार घरा-घरात पोहोचवावे, गरजवंतांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन ,सौ.अर्चना घारे परब यांनी यावेळी केले.यावेळी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, प्रसाद जबडे, ज्ञानेश्वर केणी, अंकुश नाईक, सुनील जबडे, आनंद जबडे, चंद्रकांत परब, गोविंद नाईक, ओंकार कोरगावकर, कृष्णा नाईक, साहिल नाईक आदी सहकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# sawantwadi # tarun bharat news# archna ghare parab
Next Article