For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये गोंधळ

06:14 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
उमेदवार निवडीवरून भाजपमध्ये गोंधळ
Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये 24 तासात तीन याद्या : अंतिम यादीत केवळ 15 नावे

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या. पहिली यादी सकाळी 10 वाजता आली. त्यात निवडणुकीच्या 3 टप्प्यातील 44 उमेदवारांची नावे होती, मात्र ती काही वेळातच ही यादी मागे घेण्यात आली. पहिली यादी येताच जम्मू भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची निदर्शने सुरू झाली. अन्य पक्षातून भाजपात प्रवेश केलेले उमेदवार उभे केल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर प्रदेश भाजपाध्यक्ष रवींद्र रैना यांनी हे प्रकरण हायकमांडपर्यंत पोहोचवले. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दोन तासांनी 12 वाजता दुसरी यादी आली. त्यात पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या मतदारसंघांमधील 15 उमेदवारांचीच नावे होती. यानंतर दुपारी 2.45 वाजता आणखी एक यादी जाहीर करताना कोंकनागमधून चौधरी रोशन हुसेन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागतील. भाजपने सध्या 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करण्यात आले असून प्रत्येक कार्यकर्त्यांशी वैयक्तिकरित्या बोलल्यानंतर पुढील दोन टप्प्यातील उमेदवार जाहीर केले जातील, असे रवींद्र रैना यांनी सांगितले. सुरुवातीला भाजपने पहिल्या टप्प्यासाठी 15, दुसऱ्या टप्प्यासाठी 10 आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 19 अशी एकंदर 44 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर काही प्रमुख नावे नसल्यामुळे नाराजी निर्माण झाल्याचे मानले जात आहे. या विरोधामुळे पक्षाला तीन टप्प्यांची यादी मागे घेऊन नव्याने यादी जाहीर करावी लागल्याचे दिसते.

मोदी-शहांसह 40 स्टार प्रचारक

जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचारासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवराजसिंह चौहान, योगी आदित्यनाथ आणि स्मृती इराणी यांचीही नावे यादीत आहेत. पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंग आणि शाझिया इल्मी यांची मीडिया समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. पंजाबचे मीडिया कोऑर्डिनेटर विनीत जोशी हे देखील जम्मू-काश्मीर टीमचा एक भाग असतील.

Advertisement
Tags :

.