For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

11:19 AM Dec 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
Advertisement

पदवी परीक्षेसाठी शुल्क भरले तरी अर्ज स्वीकारले जात नसल्याची तक्रार

Advertisement

बेळगाव : पदवी परीक्षेचे शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यातून पैसे जमा होत असले तरी सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नाही. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा शुल्क भरावे लागत आहे. राज्य सरकारच्या युयुसीएमएस या सॉफ्टवेअरच्या सर्व्हर डाऊनमुळे ही समस्या निर्माण होत असल्याने बेळगावसह राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठासह इतर सर्वच विद्यापीठांना परीक्षा शुल्कासाठी युयुसीएमएस हे सॉफ्टवेअर सक्तीचे करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमधूनच विद्यार्थी आपले परीक्षा शुल्क भरू शकतात. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्यांच्या खात्यातून रक्कम वजा होत आहे. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटी अर्ज ‘फेल्ड’ असा मॅसेज येत असल्याने विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. मागील आठ दिवसांपासून ही समस्या उद्भवली आहे. काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधला असता याबाबत विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, असे सांगण्यात आले. विद्यापीठाने जरी चिंता करू नये असे सांगितले असले तरी परीक्षेपर्यंत हॉलतिकीट न आल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मागीलवर्षी अशाच प्रकारामुळे 40 ते 50 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊनची समस्या दूर करण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.

चन्नम्मा सर्कल येथे आज आंदोलन

Advertisement

युयुसीएमएसमधील सर्व्हर डाऊनच्या समस्येने विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार दि. 4 रोजी सकाळी 11.30 वाजता चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात येणार असल्याने यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभाविपतर्फे करण्यात आले आहे.

सर्व्हरची समस्या कायमस्वरुपी दूर करणे गरजेचे

युयुसीएमएस या सॉफ्टवेअरचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क जमा होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ चन्नम्मा विद्यापीठच नाही तर संपूर्ण राज्यभरातील विद्यापीठांमध्ये युयुसीएमएसमुळे हीच परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरूनही त्यांना फी भरली नसल्याची रिसिट मिळाली आहे. त्यांना पैसे पुन्हा मिळावेत तसेच सर्व्हरची समस्या कायमस्वरुपी दूर करणे गरजेचे आहे.

- कुशल गोदगेरी (अभाविप पदाधिकारी)

Advertisement
Tags :

.