महायुतीमधील भांडण समोर येत आहेत! राज्यातील कायदा- सुव्यवस्था ढासळली- सतेज पाटील
आमदार सतेज पाटील यांचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
बदलापूर अत्याचारातील आरोपी साडपत नाहीत. पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांवर कोयता गँगकडून हल्ला झाला आहे. मालवण येथे छत्रपती शिवाजी पुतळा कोसळला आहे. हे गृहमंत्रालयाचे अपयश असून राज्यातील कायदा व सुव्यस्था ढासळली आहे असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना केला.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=d-zviSrEbWM[/embedyt]
महायुतीच्या कारभारावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे. राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत, हे महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण जगभर नाचक्की झाली आहे. यामुळे माफी मागून उपयोगाचे नाही तर दोषींना शिक्षा झाली पाहिजे. महायुतीचा टीआरपी संपत चालला असून विधानसभा निवडणूका लांबल्यास त्यांनाच तोटा होणार आहे. महायुतीतील भांडणे समोर येत आहेत. जागा वाटपात युतीमध्ये आणखी संघर्ष होईल. यामुळे अनेक नेते युतीतून बाहेर पडत आहेत. जनतेला हे सरकार पटलेले नाही. अन्य पक्षांना फोडण्याचे पाप केले असून याबाबतची प्रतिक्रिया लोकांमध्ये निवडणूकीत दिसेल असे आमदार पाटील म्हणाले.