इराणच्या सत्तावर्तुळात संघर्ष
इराणचे राजकीय नेतृत्व आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) दरम्यान वाद वाढतोय. या वादाच्या केंद्रस्थानी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आणि आयआरजीसी प्रमुख अहमद वाहिदी आहेत. दोघांमये अमेरिका-इस्रायलसोबत युद्ध जारी ठेवणे आणि खासकरून शेजारी आखाती देशांवरील हल्ल्यांवरून एकमत नाही. दोघांमधील हा वाद युद्धापासून सुरू झाला होता, जो अलिकडच्या दिवसांमध्ये वाढला आहे. मसूद पेजेश्कियान आणि अहमद वाहिदी यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. पेजेश्कियान हे शेजारी दांवर हल्ला करण्याच्या आयआरजीसीच्या भूमिकेमुळे नाराज आहेत. या पावलांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल प्रभाव पडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एकमत नाही
युद्धाशी निगडित कार्यकारी निर्णय आयआरजीसी ऐवजी इराणच्या सरकारने घ्यायला हवेत अशी मागणी पेजेश्कियान यांनी केली आहे. तर वाहिदी यांनी मसूद यांच्या मागणीला मान्य केले नाही. युद्ध आणि कुणावर किती हल्ले करावेत याचा निर्णय सरकार नव्हे आयआरजीसीचे कमांडरच घेतील असे वाहिदी यांचे म्हणणे आहे. वर्तमान युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या व्यवस्थेमध्ये समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक सुधार पेजेश्कियान लागू करू शकले नाहीत अशी टीका आयआरजीसी प्रमुखाने केला आहे.