महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंडी मतदारसंघात ‘धनवानां’मध्ये संघर्ष

06:02 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंडी मतदारसंघात ‘धनवानां’मध्ये संघर्ष

Advertisement

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघ यंदा वेशेष चर्चेत आहे. या राज्यात सातव्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे. हा मतदारसंघ चर्चेत असण्याचे कारण येथून भारतीय जनता पक्षाने सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत यांना दिलेली उमेदवारी हे आहे. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेसने माजी दिवंगत मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांचे पुत्र विक्रमादित्यसिंग यांना उतरविले आहे. सिंग हे राजघराण्यातील असून राणावत याही मोठ्या घराण्यातील आहेत.

Advertisement

परिणामी त्यांच्यातील स्पर्धा ही धनवान आणि ‘सिलिब्रेटी’ उमेदवारांमधील स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. दोन्ही उमेदवारांमधील शाब्दिक संघर्ष येथे रंगला असून तो मतदारांच्या चर्चेचा विषय झाला आहे. कंगना राणावत या येथे एक महिन्याच्या निवडणूक पर्यटनासाठी आल्या असून त्यांना हा मतदारसंघ माहीत नाही, असा आरोप सिंग यांनी केला होता. तर सिंग हे ‘छोटे पप्पू’ आहेत. केवळ बड्या घराण्यात जन्मले म्हणून त्यांना उमदेवारी मिळाली आहे. त्यांनी इतरांना शहाणपणा शिकवू नये. स्वत: या मतदारसंघासाठी काय केले, ते सांगावे, असा जोरदार प्रतिटोला कंगना राणावत यांनी त्यांना लगावला आहे.

प्रचंड विजय

2019 मध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या रामस्वरुप शर्मा यांनी 4 लाखांहून अधिक मताधिक्क्याने जिंकला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत येथे काँग्रेसच्या प्रतिभा सिंग यांनी 8 हजार मतांचे निसटते यश प्राप्त केले. यावेळी हा मतदारसंघ पुन्हा मिळवायचा असा निश्चय भारतीय जनता पक्षाने केला आहे. हिमाचल प्रदेशात सध्या काँग्रेसचे सरकार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात पक्षातील मतभेद उफाळून आल्याने राज्यसभेची निश्चित मानली जाणारी जागा या पक्षाला गमावावी लागली आहे. या घडामोडींचा परिणाम लोकसभा निवडणुकांवरही होईल, असे मानले जात आहे. येथे मतदारांची संख्या साधारणत: 12 लाख आहे. विधानसभेचे 17 मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात असून त्यांच्यापैकी भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत 13 जिंकले आहेत. काँग्रेसकडे केवळ 4 आहेत. त्यामुळेही येथे भारतीय जनता पक्षाचे पारडे जड असल्याची सर्वसाधारण भावना आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article