सरकारी तालीमला जप्ती नोटीस
सांगली :
सांगली जिह्यातील अनेक नामवंत मल घडवणाऱ्या सरकारी तालमीला घरपट्टी व पाणीपट्टीसाठी महानगरपालिकेने जप्तीपूर्व नोटीस बजावली आहे. कुस्तीसारख्या खेळाला आश्रय द्यायचे राहिले बाजूला मात्र सरकारी तालमीलाच जप्तीपूर्व नोटीस बजावल्याने कुस्तीगीर व कुस्तीप्रेमींकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
सरकारी तालमीकडून आजपर्यंतच्या इतिहासात कधीही घरपट्टी-पाणीपट्टी वसूल केली नाही. त्यामुळे मनपा आयुक्तांनी नोटीस मागे घेऊन तत्कालिन नगरपालिका व सध्याच्या महापालिकेची क्रीडासंस्थांना सहकार्याची परंपरा कायम ठेवावी, अशी मागणी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते यांनी केली आहे.
मोहिते म्हणाले, सांगली जिल्हा कुस्ती खेळाडूसाठी महाराष्ट्रच नव्हे तर देश पातळीवर नावलौकिक पावलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या जिह्यात अनेक कुस्तीगिर हिंदकेसरी मारूती माने, मलसम्राट विष्णूपंत सावर्डे, भारतभीम जोतिरामदादा पाटील, पै. हरी नाना पवार, पै. व्यंकाप्पा बुरूड अशा अनेक नामवंत मलांनी येथील तालीममध्ये कुस्ती सराव करून जिल्हयाचे नांव उज्ज्वल केले आहे. माझ्यासारखे गोरगरीब घरातील अनेक तऊण याच सरकारी तालमीतून मल म्हणून पुढे आले. मी स्वत: सांगली सरकारी तालीमच्या माध्यमातूनच शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये जिल्हा व राज्यपातळीपर्यंत यश मिळवले. या सरकारी तालीमच्या माध्यमातून गोरगरीब घरातील अनेक तऊण मल म्हणून नावाऊपास आले.
मध्यंतरी कुस्ती कमी होत होती. मात्र कोल्हापूरच्या शाहू राजांनी राजाश्रय देऊन कुस्ती क्षेत्राला बळ दिले. सांगलीमध्ये सध्या जी सरकारी तालीमची इमारत आहे त्या ठिकाणी पूर्वी छोटी इमारत होती, मात्र सांगलीचे राजे पटवर्धन यांनी त्यांची जागा सरकारी तालमीला देऊन त्या ठिकाणी प्रशस्त तालीम उभारण्यासाठी मदत केली.
पटवर्धन राजांनी मोफत जागा दिल्यानंतर हरिपूर व परिसरातील वीटभट्टीधारक वाळू व्यवसा†यकाकडून देणगी स्वरूपात सा†हत्य गोळा करून इमारत उभारली. व्याप्रायांकडून देणगी गोळा करून मजुरीचे पैसे भागवले आणि ही इमारत उभी राहिली. आजपर्यंत कधीही सरकारी तालमीला घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याची वेळ आली नाही. मात्र सध्याच्या आयु‹ांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी साठी नोटीस बजावून जप्तीपूर्व नोटीस दिली आहे हे योग्य नाही. ही नोटीस मागे घेऊन घरपट्टी पाणीपट्टी कायमस्वरूपी माफ करावी, अशी मागणीही मा†हते यांनी केली.
सर्वच कुस्ती केंद्राची घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी.
या सरकारी तालमीबरोबरच भोसले तालिम (फौजदार गली), आद्य बजरंग तालिम (गावभाग), हांडे पाटील ता†लम (गावभाग) वसंतदादा कुस्ती केंद्र (यशवंतनगर) मिरज येथील पाटील हौद ता†लम या तालमीमध्ये जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरील जिल्हयातील अनेक कुस्ती खेळाडू सराव करीत आहेत. त्यामुळे जी सांगली मिरज कुपवाड शहरासह सर्वच कुस्ती केंद्राची घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी, अशीही मागणी मा†हते यांनी केली आहे.