For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या टप्प्यातील ईव्हीएमचे वितरण निश्चितीकरण

11:55 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या टप्प्यातील ईव्हीएमचे वितरण निश्चितीकरण
Advertisement

30 टक्के मतदान यंत्रे राखीव : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार दुसऱ्या टप्प्यातील यंत्रांचे वितरण निश्चित करण्यात आले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक, खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यातील ईव्हीएम मशीन वितरण निश्चितीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघामधील स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएम मशीन पाठविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान केंद्रासाठी ही प्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील यंत्रे वितरण निश्चिती करण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या पथकानुसार ही यंत्रे पाठविली जाणार आहेत. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट ही यंत्रे निश्चित करण्यात आली आहेत.

100 टक्के मतदान यंत्रे मतदान केंद्रानुसार पाठविण्यात येत आहेत. अतिरिक्त 30 टक्के मतदान यंत्रे राखीव ठेवली आहेत. मतदान केंद्राला मतदान यंत्रे पाठविल्यानंतर तांत्रिक दोष आढळल्यास राखीव ठेवण्यात आलेल्या यंत्रांचा उपयोग केला जाईल, असे जिल्हाधिकऱ्यांनी सांगितले. दि. 25, 26 आणि 27 एप्रिल रोजी घरोघरी जाऊन मतसंग्रह केली जाणार आहेत. घरातून मतदान करू इच्छिणाऱ्या दिव्यांग व 85 वर्षांवरील नागरिकांची मते निश्चित करण्यात आली आहेत. संबंधितांकडून नियोजित नमुना अर्ज भरून मतसंग्रह केली जाणार आहेत.  घरोघरी जाऊन मतसंग्रहित करताना राजकीय पक्षाचे एजंट उपस्थित राहू शकतात. यासाठी संबंधित राजकीय पक्षांकडून एजंटांची नेमणूक करण्यासंदर्भात कळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी निरीक्षक एम. के. अरविंदकुमार, पोलीस अधिकारी पवनकुमार, खर्च पर्यवेक्षक हरक्रिपाल खटाना, नरसिंहराव बी., पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, डीसीपी रोहन जगदीश, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.