जन्मापासून 6 वर्षांपर्यंत खोलीत कैद
आई-बाप ठरले सैतान
ब्राझीलमध्ये एका दांपत्याने स्वत:च्या मुलीला जन्मानंतर 6 वर्षांपर्यंत एकाच खोलीत ठेवले आणि तिला केवळ द्रव आहारावर ठेवले. हे करण्यामागे त्यांच्याकरता कुठलेच कारण नव्हते तसेच त्यांना याचे वाईट देखील वाटत नव्हते. साओ पावलो प्रांतातील सोरोकोबामध्ये एका निनावी तक्रारीनंतर पोलीस एका घरात पोहोचले असता, त्यांना एका काळोखयुक्त आणि भीतीदायक खोलीत मुलगी कुलुपबंद अवस्थेत आढळून आली. या मुलीने स्वत:चे 6 वर्षांचे पूर्ण जीवन याच खोलीत घालविल्याचे समजते.
या मुलीच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोलिसांनुसार मुलीला कुठलीही आवश्यक लस देण्यात आली नव्हती. तसेच ती बोलू शकत नव्हती. मुलीची अवस्था अत्यंत खराब होती आणि ती सर्वप्रकारच्या गोष्टींबद्दल अत्यंत अधिक भ्रमित होती. तिचे केस कधीच धुतले गेले नव्हते असे वाटत होते असे बाल संरक्षण सल्लागार लिगिया गुएरा यांनी सांगितले. मुलीला इतक्या वर्षांमध्ये केवळ द्रवपदार्थांवर जिवंत ठेवण्यात आले होते. मुलीने समुपदेशक आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर केवळ असामान्य आवाजांमध्ये संभाषण पेले. या मुलीला नंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्याहून अजब अवस्थेत तिचे आईवडिल होते. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघेही पोलिसांच्या कोठडीत आहेत. मुलीच्या आईला स्थितीचे गांभीर्यच समजत नव्हते. दोन्ही पालकांनी कुठल्याही प्रकारची खंत व्यक्त केली नाही.